आमदार यांनी मतदार संघातील रखडलेली विकास कामे मार्गी लावण्यासाठी विधान सभेच्या सत्रात केली मागणी
दर्यापूर :
अंजनगाव सुर्जी मतदार संघाचे आमदार यांनी विधान सभेच्या पावसाळी अधिवेशनात काल मतदार संघातील रखडलेली विकास कामे मार्गी लावण्यासाठी अधिवेशनाच्या सत्रात मागणी केली.
मतदार संघातील संत गाडगे महाराज यांची जन्मभूमी शेंडगाव ता अंजनगाव व कर्मभूमी अमला ता दर्यापूर या दोन्हीं आराखड्याचे काम अंतीम टप्प्यात असून निधी अभावी रखडले आहे. हे पूर्ण करण्यासाठी 22 कोटी रुपयांची आवश्यकता असून निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली तसेच मतदार संघात मोठ्या प्रमाणात मूलभूत सुविधा चा अभाव आहे गाव अंतर्गत रस्ते, नाल्या, सभागृह, वाचनालय स्मशान शेड स्मशान भूमी रस्ता इत्यादी विकासकामासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार बळवंत वानखेडे यांनी विधान सभेच्या पावसाळी अधिवेशनात केली.