अंजनगाव सुर्जी NEWS
सन २००२ मध्ये गुजरात येथे गोधरा दंगलीत बिल्कीसबानो या महिलेवर गैंगरेप करण्यात आले होते व तिच्या परिवारातील ७ सदस्यांची हत्या करण्यात आली त्याबद्दल संबधित आरोपींना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती परंतू दिनांक १५ ऑगस्ट २०२२ रोजी गैंगरेप प्रकरणातील आरोपींना सोडून देण्यात आले. या आरोपींना सोडून सरकारने अशोभनीय काम केले आहे. न्यायालयाने संबधित आरोपींना दोषी मानून शिक्षा सुनावली होती मग सरकारने कसे सोडून दिले.म्हणून अंजनगाव सुर्जी समाजवादी पक्षाच्या वतीने तहसीलदार अंजनगाव सुर्जी मार्फत राष्ट्रपतीला निवेदन देवून सोडण्यात आलेले आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली. याप्रसंगी समाजवादी पक्षाचे ज़ाकिर मंसूरी ,नईम बेग, मोहसिन राणा, अब्दुल वाजिद, मोहम्मद शाकिर, कलीम मंसूरी, अब्दुल रहीम, मोहम्मद रिजवान, मो सलमान, शेख कलीम, शोहेब टाटा , नईम मंसूरी तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.