पोलीस स्टेशनमध्ये शांतता समितीची बैठक संपन्न, उपविभागीय पोलिस अधिकारी उपस्थित

पोलीस स्टेशनमध्ये शांतता समितीची बैठक संपन्न, उपविभागीय पोलिस अधिकारी उपस्थित...



अंजनगाव सुर्जी : 

पोलीस स्टेशनमध्ये आज शांतता समितीची बैठक संपन्न झाली या बैठकीला अंजनगाव दर्यापूर स्टेशनचे उपविभागीय पोलिस अधिकारी उपस्थित होते. कोरोनाच्या दोन वर्षाच्या कालावधीनंतर प्रथमच यावर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार असून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली. 

बैठकीत उपविभागीय अधिकारी, ठाणेदार यांनी उपस्थित शांतता समितीचे पदाधिकारी व विविध सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना उत्साहाबाबत सूचना दिल्या व मार्गदर्शन केले.उपस्थित शांतता समितीची सदस्य तसेच विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यानी उत्सवाबाबत आपले विचार मांडले व शांतता समिती सदस्य पोलीस प्रशासनास काही सूचना देऊन मार्गदर्शन केले.याप्रसंगी शांतता समिती सदस्य, विविध संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.