अंजनगाव सुर्जी NEWS...
अंजनगाव सुर्जी पान अटाई येथील युवक हा शेतीच्या कामासाठी नदीचा पूर ओलांडून गेला असता शहानूर नदीच्या पुरात युवक वाहून गेल्याची घटना ९ ऑगस्ट रोजी घडली होती.अंजनगाव तालुक्यात सततधार पाऊस चालू असल्यामुळे शहानूर धरणाचे चारही दरवाजे उघडण्यात आल्याने शहानूर नदीला पूर आला होता.युवक हा खोडगाव रोडवर शेतीच्या कामासाठी नदीचा पूर ओलांडून जात असताना त्याचा पाय घसरला व तो वाहून गेला.सैय्यद जुनेद सैय्यद उस्मान वय १८ वर्ष राहणार पान अटाई असे नदीच्या पुरात वाहून गेलेल्या युवकाचे नाव असून प्रशासनाने त्याचा शोध घेतला असता तो मृत आढलुन आला. तहसील प्रशासनाकडून युवकाचा पंचनामा करून अहवाल शासनास सादर करण्यात आला होता. शासनाकडून सदर युवकाच्या कुटुंबाला आज आमदार बळवंत भाऊ वानखडे यांच्या हस्ते चार लाख रुपयाचा धनादेश देण्यात आला. याप्रसंगी तहसीलदार अभिजीत जगताप, मंडळ अधिकारी राजकुमार गवई, काँगेस तालुकाध्यक्ष प्रमोद पाटील दाळू, शहराध्यक्ष प्रदिप देशमुख, मोहम्मद सिद्दीक भाई,आदर्श सरपंच पुरूषोत्तम घोगरे, आशिक अंसारी, शोएब खान, डॉक्टर साकीब, शब्बीर खान, व पदाधिकारी उपस्थित होते.