शाहनुर नदीच्या पुरात पाय घसरून वाहून गेलेल्या युवकाच्या कुटुंबाला शासनामार्फत आमदार बळवंत भाऊ वानखडे यांच्या हस्ते चार लाखाची मदत
सैयद जुनेद सैयद उस्मान रा. शरीफ नगर अंजनगाव सुर्जी यांचा खोडगाव येथे शहानुर नदी मध्ये पोहायला गेले असता त्यांचा त्यामध्ये वाहून जाऊन मृत्यू झाला.नैसर्गिक आपदा मधून त्यांच्या परिवाराला 4 लाखांची मदत मिळावी यासाठी आमदार बळवंतभाऊ वानखडे व मो.सिद्धीकभाई यांनी प्रयत्न केले व आज त्यांना 4 लाखांची मदत देण्यात आली, त्यावेळी उपस्थित आमदार बळवंतभाऊ वानखडे,तहसीलदार अभिजीत जगताप साहेब, मो सिद्धीकभाई, प्रदीपभाऊ देशमुख, डॉ. शाकीब, मो शाकिरभाई,पुरुषोत्तम घोगरे, इमरान विठानी, नासिर खान, सलामभाई, अजीज पहेलवान, शब्बीर खा.त्या नंतर या कार्यासाठी मो. शाकिर मो शरीफ यांच्या घरी आमदार बळवंतभाऊ वानखडे व तहसीलदार जगताप साहेब, प्रमोद दाळू, प्रदीप देशमुख यांच्या सत्कार करण्यात आले.