पाणलोट क्षेत्रात सततधार पाऊस पडत असल्यामुळे शहानुर प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ झाली त्यामुळे काल मध्यरात्री शहानूर प्रकल्प धरणाचे चार दरवाजे 5 सेंमी ने उघडण्यात आले होते याची माहिती पाटबंधारे विभागाचे सहाय्यक अभियंता सुमित हिरेकर यांनी दिली.गेल्या दोन तीन दिवसां पासून चालू असलेल्या सतत पावसामुळे धरणात पाण्याची आवक वाढली आहे.तसेच पाणलोट क्षेत्रात पाऊस पडत असल्यामुळे धरणात 96.50 टकके पाणीसाठा वाढला आहे त्यामुळे धरणाचे चार दरवाजे ५ सेंमी ने उघडण्यात आले.धरणातून पाण्याचा विसर्ग केला जात असल्याने नदीला पूर येण्याची शक्यता असते.असाच पाउस पडत राहिला तर धरणातून आणखी पाणी सोडण्यात येईल अशी माहिती अभियंता यांनी दिली आहे.अशा परिस्थितीत नदी काठावर राहणाऱ्या लोकांनी सतर्क राहून कोणीही नदी पात्र ओलांडू नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले.