अंजनगाव सुर्जी शहरातील रायसाहेब मोती संगई सभागृहात पोलीस विभागाकडून शांतता समितीची बैठक संपन्न झाली

Anjangaon Surji News
अंजनगाव सुर्जी शहरातील स्व. रायसाहेब मोती संगई सभागृहात गणेश उत्सवाच्या निमित्ताने शहर व तालुक्या साठी पोलीस विभागा कडून शांतता समितीची बैठक संपन्न झाली.या बैठकीत शहरातील मान्यवरांनी गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन करून हिंदू-मुस्लिम एकोपा याला कुठल्याही प्रकारचे गालबोट न लागू देता गणपती विसर्जन करण्यात यावे.विसर्जनावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये त्याकरिता पोलीस प्रशासनाकडून जनजागृती करण्यात येईल तसेच गणपती विसर्जन शांततेत पार पाडावे गणेश मंडळांनी सामाजिक बांधिलकीची जनजागृती करावी अशा सूचना पोलीस प्रशासनाकडून देण्यात आल्या.या बैठकीला सालाबादाप्रमाणे अंजनगाव सुर्जी तालुक्यातील बरीच नागरिकांची उपस्थिती लाभली होती त्यामुळे अधिकाऱ्यांनी ही बाब जाणून घेऊन उपस्थित नागरिकांचे शब्द सुमनांनी कौतुक केले. कोरोना काळात मुस्लीम समाजाने मोलाचे योगदान देत खूप चागले काम केले हे कार्य कौतुकास्पद आहे असे उदगार आमदार बळवंत वानखडे यांनी काढले
बैठकीला अमरावती जिल्हा अधिकारी श्रीमती पवनीत कौर, अमरावती जिल्हा पोलिस अधिक्षक अविनाश बारगळ ,पोलीस उपविभागीय अधिकारी सचिद्रं शिंदे ,दर्यापूर उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर तहसीलदार अभिजीत जगताप ,अंजनगाव सुर्जी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिपक वानखडे, नगर परिषद मुख्याधिकारी सुमेधा आलोणे , पोलीस अधिकारी कर्मचारी आणि शहर व तालुक्यातील प्रतिष्ठित मान्यवर पोलीस पाटील,पत्रकार, राजकीय पदाधिकारी,गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी,मोठ्या संख्येने उपस्थित होते. शांतता समितीच्या बैठकीत यावर्षी भाऊगर्दी दिसून आली.