जयपूर-मुंबई ट्रेनमध्ये आर.पी. एफ. तरुणाने केलेल्या हल्ल्यात ठार झालेल्या चार मृतांमध्ये हैदराबादच्या नामपल्ली येथील रहिवासी सय्यद सैफुल्ला, दुसरा मृत अब्दुल कादिर भाई मुहम्मद हुसेन, वय 62 वर्ष, पाल घर, महाराष्ट्र येथील रहिवासी होता आणि तिसरा मृत असगर अब्बास शेख वय 48 वर्षे मधुबनी, बिहारचा रहिवासी होता आणि तो आपल्या कुटुंबासह राहत होता. चौथा बळी ASI तुकाराम मीना वय 58 वर्षांचा आहे.आरपीएफ कॉन्स्टेबल चेतन सिंगने तीन मुस्लिम प्रवासी आणि एका एएसआय अधिकाऱ्याची हत्या केल्यानंतर, संपूर्ण यंत्रणा मीडिया, वाहिन्यांवर आरोपीला 'मानसिकदृष्ट्या अस्थिर' किंवा मानसिक आजारी म्हणून वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. तीन वेगवेगळ्या बोगींमध्ये मुस्लिम नाव आणि ओळख असलेल्या प्रवाशांची हत्या करणे आणि संघाच्या सिद्धांताच्या समर्थनार्थ विधाने करणे, हे सिद्ध करते की आरोपी मानसिकदृष्ट्या सुदृढ आहे आणि गुन्हा पूर्वनियोजित होता. तसेच, मोदी आणि योगी यांसारख्या राजकारण्यांना मतदान न केल्याने समान परिणाम होतील हे त्याचे विधान संघ परिवाराने प्रचारित केलेल्या कट्टरतावादी विचारांचे प्रमाण सांगते.
यावेळी निवेदना व्दारा मागणी करण्यात आली की
रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या मुस्लिम प्रवाशांना योग्य मोबदला देण्यात यावा, त्यांच्या कुटुंबीयांनाही नोकरी देण्यात यावी आणि आरोपी हवालदारावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी संघटना युथ विंग जमाअत-ए-इस्लामी महाराष्ट्राने केली आहे. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी जेणेकरून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळेल.विशेषत: अल्पसंख्याकांच्या सुरक्षेबाबत विश्वास प्राप्त होईल.
यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना जमाते-ए-इस्लामी हिंद चे यूथ विंग प्रदेश अध्यक्ष मोहम्मद उमर खान यांनी सांगितले की
जमाअत-ए-इस्लामीची युवा शाखा महाराष्ट्र सरकारकडे विशेष मानसिकतेच्या व्यक्तींकडून अल्पसंख्याकांवरील हिंसाचाराच्या कृत्यांवर कडक कारवाई करण्याची, कायदा आणि सुव्यवस्था पूर्ववत करण्याची आणि गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी करते. जेणेकरून भविष्यात अशा घटना घडणार नाहीत, घटनांची पुनरावृत्ती होणार नाही.आम्ही भारताच्या राष्ट्रपतींना विनंती करतो की त्यांनी भारतातील नागरिकांमध्ये शांतता, सौहार्द आणि समानता प्रस्थापित करण्यासाठी आवश्यक पावले उचलावीत. देशातील शांतताप्रिय नागरिकांमध्ये द्वेष पसरू नये यासाठी राजकीय पक्ष आणि प्रसारमाध्यमांवर लक्ष ठेवले पाहिजे.