केंद्र सरकारच्या हिट अँड रन कायद्याच्या विरोधात अंजनगाव सुर्जी जुना बस स्थानक चौकात मोटर कामगार संघटनेचा निषेध काम बंद आंदोलन


Anjangaon Surji News जावेद शाह 9372611767 

केंद्र सरकारने पारित केलेला हिट अँड रन कायद्याविरोधात आज दिनांक १ जानेवारी रोजी अंजनगाव सुर्जी जुना बस स्थानक मोटर वाहन कामगार संघटनेकडून पारित केलेल्या कायद्याचा निषेध करण्यात आला. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत हिट अँड रन कायदा पारित करून सर्व वाहन चालकांमध्ये सभ्रम निर्माण केला आहे,सदर कायदा एखादा अपघात झाल्यास दुर्घटना ग्रस्त व्यक्तीला दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यासंबंधात आहे.पारित करण्यात आलेल्या कायद्यानुसार एखादा अपघात झाल्यास त्या चालकाने अपघात ग्रस्ताला दवाखान्यात पोहचवायला पाहिजे जर त्याने असे केल तर त्याला शिक्षेत सूट मिळणार जर चालकाने दुर्घटनाग्रस्ताला दवाखान्यात न पोहचविल्यास दहा वर्षाची शिक्षा किंवा सात लाख रुपये दंड असा हा कायदा आहे.यामुळे देशातील सर्व लहान मोठे वाहन चालक यांच्यात या कायद्याविषयी सभ्रम निर्माण झाला. 
अपघात झाल्यास चालकाने दुर्घटनाग्रस्ताला दवाखान्यात न्यावे की स्वतःचा बचाव करावा,अपघात झाल्यास आजूबाजूला असलेली सर्व लोक एकत्र येऊन चालकावर कोणतीही परिस्थीती न पाहता थेट हल्ला करतात त्यामुळे चालक स्वतःचा जीव वाचवून नजीकचे पोलीस स्टेशन गाठतो यामुळे चालक दुर्घटनाग्रस्त व्यक्तीला दवाखान्यात नेण्यासाठी असमर्थ ठरतो.पारित करण्यात आलेल्या कायद्यामुळे चालक वाहन चालविण्यास भयभीत होत असल्यामुळे लागू करण्यात आलेल्या कायद्यामुळे चालकांमध्ये सभ्रम निर्माण झाला आहे.लागू करण्यात आलेला कायदा केंद्र सरकारने त्वरित मागे घ्यावा यासाठी मोटर वाहन कामगार संघटना व विविध वाहन संघटनेच्या आज जुना बस स्थानक चौकात निषेध आंदोलन करण्यात आले आहे. या आंदोलनात तालुक्यातील लहान मोठे मोटर चालक वाहक यांनी जुना बस स्थानक परिसरात आपली वाहने उभी करून केंद्र सरकारने पारित केलेल्या कायद्याचा निषेध केला यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता सदर आंदोलनात चालक वाहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.