प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार अरुण वानखडे यांच्या अंजनगाव सुर्जी येथील मुख्य प्रचार कार्यालयाचे आज शुक्रवार रोजी जगन दादा हरणे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले.अचलपूर नगर पालिकेचे माजी नगराध्यक्ष अरुण वानखडे यांनी आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने दर्यापूर मतदार संघात उमेदवारी दाखल केली.दर्यापूर रोडवर त्यांच्या पक्षाचे मुख्य प्रचार कार्यालय उघडण्यात आले असून त्या प्रचार कार्यालयाचे आज उद्घाटन करण्यात आले यावेळी प्रामुख्याने उद्घाटक जगनदादा हरणे,प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार माजी नगराध्यक्ष अरुण वानखडे, कसबेगव्हाण येथील सरपंच शशिकांत मंगळे, प्रहार जनशक्ती पक्षाचे उपजिल्हाध्यक्ष शंभूराजे मालठाणे, आकाश खारोडे, अमोल शिंगणे, अपंग शहर अध्यक्ष शाह उमर अब्दुल्ला, माजी नगर सेवक मुनाफ भाई,आदी मान्यवर उपस्थित होते.प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्याला मतदारसंघातील प्रतिष्ठित नागरिक, व आमदार बच्चु कडू समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.उद्घाटन सोहळ्याच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते थोर महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन व हारार्पण करण्यात आले.
यादरम्यान अरुण वानखाडे यांनी मतदार संघात विकास आराखडा तयार करून रोजगार निर्मिती, उद्योग निर्मिती कशी होईल यासाठी प्रयत्न करेल तसेच तळागाळातील मूलभूत समस्या सोडविण्यासाठी नेहमीच कटिबद्ध राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.