वस्तापूर वनखंडातील मृत नर वाघाच्या प्रकरणात चार आरोपी ताब्यात

Anjangaon surji News ...... 
मेळघाट प्रादेशीक वनविभाग परतवाडा अंतर्गत येणाऱ्या अंजनगावं सुर्जी तालुक्यातील वस्तापूर वनखंड क्रमांक १३२ मध्ये पांढराखडक वर्तुळात नर वाघ मृतावस्थेत आढळून आला असता या प्रकरणी वनविभागाने अकोट तालुक्यातील बल्लाखेडा येथील ४ संशयीत आरोपींना अटक केली असुन त्यांच्याकडुन मृत वन्यप्राणी वाघाचे
चार नखेही जप्त करण्यात आले आहे.अंजनगांव वनपरिक्षेत्रात २६ नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास मृत वाघाची घटना उघडकीस आल्यानंतर वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल होत शवविच्छेदन करत अहवाल पाठविण्यात आला.
त्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरु केली असता वनविभागाने ४ संशयीत आरोपींना अटक करत त्यांच्याकडून मृत वाघाची चार नखे जप्त केली असुन उर्वरीत नखे शोधण्याकरीता तपासणी सुरु असुन या घटनेत आणखीन काही आरोपींचा सहभाग आहे का ? याची चौकशी वनअधिकाऱ्यांकडून केल्या जात असल्याची माहिती उपवनसंरक्षक अग्रीम सैनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.