अडगावं येथील विषबाधा ग्रस्त विद्यार्थ्यांची खासदार बळवंत वानखडे यांनी घेतली भेट निकृष दर्जाचे पोषण आहार देणाऱ्यांना धरले धारेवर

Anjangaon surji News 
जावेद शाह 9372611767 

मोर्शी तालुक्यातील अडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ३० ते ३२ विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचा दिलेल्या शालेय पोषण आहारातून दिनांक २८ डिसेंबर २०२४ रोजी विषबाधा झाली होती. त्यामुळे शालेय आहार घेणारे विद्यार्थी अक्षरशः अस्थवस्त्य झाले होते. याची माहिती मिळताच खासदार बळवंत वानखडे यांनी अडगाव ता. मोर्शी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात भेट देऊन विद्यार्थ्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. 

अडगाव ता. मोर्शी येथील जिल्हा प्राथमिक शाळेत गावातील ८० विद्यार्थी वर्ग १ ते ४ पर्यंत शिक्षण घेत आहे. यामध्ये ६ ते १० वयोगटातील विद्यार्थ्यांचा समावेश असून २८ डिसेंबर २०२४ रोजी विद्यार्थी सकाळची शाळा असल्याने विद्यार्थी दररोज प्रमाणे शाळेत गेले असता दैनंदिन शालेय पोषण आहारात विद्यार्थ्यांना खिचडी व मोट देण्यात आली. शाळा सुटल्यावर विद्यार्थी घरी गेले असता रात्री ११ नंतर ३० ते ३२ विद्यार्थ्यांना अचानक संडास व उलट्या सुरू झाल्याने विद्यार्थ्यांची स्थिती अत्यंत अस्थावस्त झाली होती.तसेच पालकवर्गात कमालीची दहशत निर्माण होऊन धावपळ सुरू झाली होती. निकृष् दर्जाचे शालेय पोषण आहार खाल्यामुळे विद्यार्थ्यांची ही स्थिती झाली असल्याचे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पथकाद्वारे पाहणी केल्यानंतर प्रथमदर्शनी निदर्शनास आले. 

याची माहिती मिळताच अमरावती लोकसभा मतदारसंघाचे खासदार बळवंत वानखडे यांनी घटनास्थळी भेट देऊन विद्यार्थ्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. तसेच याप्रकरणी चौकशी करून कार्यवाही करण्याचे आदेश दिलेत. यावेळी डॉ राजीव ठाकूर , रमेश काळे , दीपक सरदार , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ आसोले साहेब , पवन काळमेघ,शुभम सिरसाठ , तसेच गावकरी मंडळी व विद्यार्थ्याचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते