नगरपरिषद केंद्र व क्रीड़ा सांस्कृतिक महोत्सवात न.प.लालबहादुर शास्त्री प्राथमिक शाळा ठरली चॅम्पियन

सक्सेना प्राथमिक नगर परिषद शाळा पवनी येथे 28 डिसेंबर 2024 रोजी नगर परिषद केंद्र व क्रीडा सांस्कृतिक महोत्सवाचे बक्षीस वितरण समारंभ पार पडले.यामध्ये नगर परिषद लाल बहादूर शास्त्री प्राथमिक शाळा ही चॅम्पियन ट्रॉफीची मानकरी ठरली.
आयोजीत स्पर्धेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.ह्या तीन दिवसीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन पवनी येथील नगर परिषद सक्सेना प्राथमिक शाळेच्या भव्य प्रांगणात करण्यात आले होते.या महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी मा.अशोक गिरी सर,स.शि.अषित प्राथ शाळा पवनी तर प्रमुख अतिथी म्हणून राजू तुमसरे केंद्र प्रमुख,दौलत मसराम केंद्र कार्यवाह,मुख्याध्यापक प्रकाश ढवळे सर, अनिल चेटुले सर, राकेश भिस्त उपस्थित होते.कार्यक्रमाचे उद्घाटन विद्येची देवता माता सरस्वती व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन व हारार्पण करून करण्यात आले.तसेच उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
या स्पर्धेत प्राथमिक गटातील,(मुले,-मुली) कबड्डी,खो-खो,४०० मीटर रिले,दौंड, लांब उडी,समुहगान व समुहनृत्य  आदी स्पर्धा घेण्यात आल्या त्यात केंद्रातील सर्व न.प व खाजगी अशा एकूण दहा शाळांनी सहभाग घेतला होता.स्पर्धेत सर्वात जास्त गुण मिळविणाऱ्या नगरपरिषद लालबहादूर शास्त्री केंद्र प्राथमिक शाळेला "चॅम्पियन ट्रॉफी" देऊन मान्यवरांचे हस्ते गौरविण्यात आले. विजेत्या विद्यार्थ्यांना नायब तहसीलदार सुभद्रा धुर्वे मॅडम यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले तसेच अशोक गिरी सर यांनी अध्यक्षीय भाषणात खेळामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास होतो असे मोलाचे मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रप्रमुख राजु तुमसरे सरांनी करून तीन दिवशीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाची रूपरेषा सादर केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहा.शिक्षिका शिल्पा गजभिये मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन  सहा.शिक्षिका भारती चवळे मॅडम यांनी केले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी केंद्र कार्यवाह दौलत मसराम सर,सहकार्यवाह संतोष चौफाडे सर,शाळेचे मुख्याध्यापक अनिल चेटुले सर,केंद्रातील समस्त मुख्याध्यापक,शिक्षक,क्रीडा व व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य पालक वर्ग,स्वंयसेवक तथा शालेय विद्यार्थी यांनी मोलाचे सहकार्य केले.