जावेद शाह 9372611767
दर्यापूर,अकोला मार्गावर लासूर नजीक दोन कार अमोरासमोर धडकल्याने झालेल्या अपघातात दर्यापूर शहरातील तीन तरुणांचा मृत्यु तर तिघे गंभीर जख्मी झाले. ही घटना लासूर,गोळेगाव नजीक सोमवार २ डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास घडली. या दुर्घटनेने दर्यापूर शहरात सर्वत्र शोकसंवेदना व्यक्त केल्या जात आहे.
प्राप्त माहितीनुसार दर्यापूर येथील तीन युवक क्रेटा गाडी क्रमांक एमएच २७ डीई ६२६० या कारने आनंद बहाकर ( २६ रा. सांगळुद नगर,) विनीत बिजवे ३८ रा. गजानन मंदिर साईनगर, प्रतीक बोचे (३५ रा. सांगळुदकर नगर हे अकोला जात होते. तर विरुध्द दिशेने दर्यापूर येथील बाभळी निवासी व्यवसायीक आकाश रमेश अग्रवाल रमेश उर्फ रम्मू सेठ अग्रवाल, पप्पू घाणीवाले हे ऑडी कार क्रमांक एमएच २९ बिसी ७७८६ मध्ये आकोल्यावरुन दर्यापूरकडे परत येत असतांना अचानक कारवरील नियंत्रण सुटल्याने दोन्ही कार अमोरासमोर धडकल्याने या अपघातात प्रतीक बोचे व विनीत बिजवे यांचा घटनास्थळी मृत्यु झाला तर आनंद बहाकार याला जख्मी अवस्थेत दर्यापूर उपजिल्हा रुग्णालयात नेत असतांना रस्त्यातच त्याची प्राणज्योत मालवली. या घटनेची माहिती होताच मृतकाचे नातेवाईक मित्रमंडळीनी उपजिल्हा रुग्णाला दर्यापूर येथे गर्दी केली. तर अपघातात जख्मी झालेल्या अग्रवाल पिता पुत्रांना तथा इतर जख्मी ना उपचारासाठी अकोला येथे दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेने दर्यापूर शहरात सर्वत्र शोकसंवेदना व्यक्त केल्या जात आहे..